गोस्वामींच्या प्रकृतीची राज्यपालांना चिंता; गृहमंत्र्यांशी केली चर्चा

मुंबई प्रतिनिधी । तळोजा कारागृहात शिफ्ट करण्यात आलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती विषयी चिंता व्यक्त करत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून वार्तालाप केल्याचे वृत्त आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सध्या अटकेत असलेले रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या प्रकृती व सुरक्षेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा व आरोग्याबाबत आपली चिंता व्यक्त केली. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबीयांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलू देण्याची अनुमती द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी यापूर्वी अनिल देशमुख यांच्याकडे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या पद्धतीवरून चिंता व्यक्त केली होती.

Protected Content