जळगाव प्रतिनिधी । काहीही एक कारण नसतांना प्राध्यापकाकडून विद्यार्थ्यास मारहाण केल्याची घटना येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी मंगेश भगवान गायगोधने (वय-21) रा. जिंतूर ता.जि.परभणी हा इलेक्ट्रीकल विभागाच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. आज दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास मंगेश याने विभागात सहाय्यक प्राध्यापक मयुरेश राव यांना नमस्कार करण्यासाठी हात वर केला होता. याचा राग प्राध्यापक राव यांना आल्याने काहीही एक कारण नसतांना मारहाण मंगेशला मारहाण केली. याप्रकरणानंतर विद्यार्थ्यांने प्राचार्य आर.डी.कोकाटे यांच्याकडे तक्रार दिली. यावर चौकशी करण्यात येईल असे सांगण्यात आले तसेच या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता प्राचार्यांनी देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती विद्यार्थी मंगेश गायगोधने यांने ‘लाईव्ह ट्रेन्डस न्यूज’शी बोलतांना सांगितले.