धरणगाव (प्रतिनिधी) येथील मराठा समाजाचे युवा नेते, उद्योगपती व संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोपाल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सर्व पक्षांच्या वतीने बुधवारी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, जि.प. चे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, न.पा.चे शिवसेनेचे गट नेते पप्पू भावे, युवक कॉग्रेसचे नेते चंदन पाटील, माजी उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते दिपक वाघमारे, भा.ज.पा.चे नगरसेवक गुलाब मराठे, माजी उपनगराध्यक्ष व शेतकरी सेनेचे नेते देविदास महाजन, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ, महात्मा फुले वाचनालयाचे अध्यक्ष राजू वाघ, रवी महाजन, परेश जाधव, कॉंट्रेक्टर देशमुख आदी उपस्थीत होते.