राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवाब दो निषेध मोर्च्याने दणाणले जळगाव शहर !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज पक्ष कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाब दो निषेध मोर्चा काढण्यात आला. यात सहभागी झालेल्यांनी सरकारचा निषेध व्यक्त करून जोरदार घोषणांनी शहर दणाणून सोडले.

केंद्र व राज्यातील भाजप सरकारने विकासाची कामे केली नसून जनतेची दिशाभूल केली आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा कार्यालयापासून याला प्रारंभ झाला. यात पक्षाचे निरिक्षक करण खलाटे यांच्यासह आमदार डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील, विलास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, अरुण पाटील, अनिल भाईदास पाटील, संजय गरुड, गफ्फार मलिक, नामदेव चौधरी, अभिषेक पाटील, कल्पना पाटील, कल्पीता पाटील, अ‍ॅड. कुणाल पवार, रोहन सोनवणे, सविता बोरसे, माधुरी पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. युवक जिल्हा अध्यक्ष ललित बागुल व शहर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेसने याचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयापासून विविध घोषणा देत पक्षास प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षातर्फे भजी तळून उपस्थितांना वाटप करून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. येथे पोलीसांसोबत काही काळ शाब्दीक चकमक झाल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके यांना निवेदन देण्यात आले.

Add Comment

Protected Content