विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागातर्फे १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ‘दक्षिण चीन समुद्रात चीनचा सागरी विस्तार’ या विषयावर ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

 

ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्रात बुधवार दि. १६ फेब्रुवारी रोजी तैवान एशिया एक्सचेंज फाऊंडेशनच्या व्हिजीटींग फेलो डॉ. सना हाश्मी, दि. १७ रोजी सोनीपत येथील ओ. पी. जिंदाल ग्लोबल विद्यापीठाच्या सेंटर फॉर नॉर्थईस्ट एशियन स्टडीजच्या संचालक डॉ. श्रीपर्णा पाठक आणि दि. १८ रोजी दक्षिण कोरियातील एशिया इन्स्टिटयुटचे संचालक डॉ. लखविनदर सिंह यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन बुधवारी प्रभारी प्र-कुलगरू प्रा. बी.व्ही. पवार यांच्या हस्ते होईल तर शुक्रवारी प्रभारी कुलसचिव डॉ. आर.एल. शिंदे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ. अनिल चिकाटे, डॉ. तुषार रायसिंग व सुभान जाधव यांनी आयोजन केले आहे.

Protected Content