अज्ञात समाजकंटकांकडून तीन रिक्षासह दुचाकीचे नुकसान

Riskash nuksan

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहू नगर भागात एकाची गल्लीतशनिवारी मध्यरात्री अज्ञात समाजकंटकांकडून धारदार हत्याराने तीन रिक्षासह दोन दुचाकीच्या सिटवर रिक्षाचा टप आणि दुचाकीच्या सिटचे नुकसान केल्याचा प्रकार आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत शहर पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, शाहू नगरातील बिहस्ती मोहल्ला येथील युनुस खान जाफर खान (वय-42) हे रिक्षा चालक आहे. त्यांनी दररोजप्रमाणे आपली रिक्षा क्रमांक (एमएच 19 व्ही 5670) सायंकाळी 9 वाजता घरासमोर पार्किंगकरून लावली होती. रात्री 10.30 वाजेपासून ते मध्यरात्री दीड वाजेपर्यंत कुटुंबियांसोबत गप्पा मारत झापले. मध्यरात्री 1.30 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान समाजकंटकांनी उभी रिक्षाच्या कापडी टपला धारदार शास्त्रांने कापून नुकसान केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस आला.

गल्लीतीलच इतर दोन रिक्षा आणि दुचाकीचेही नुकसान
बिहस्ती मोहल्लामधील इद्रिस खान जाफर खान (वय-35) यांची रिक्षा क्रमांक एमएच-19 बीयु 1390, जावेद शेख लतीफ शेख यांची रिक्षा (एमएच-19 सीडब्ल्यू 1787), अब्दुल बपाती दिस्ती (वय-30) यांची मोपेड ॲक्टीव्हा क्रमांक (एमएच-19 अेआर 5355), आणि त्याच भागातील एकाची (नाव माहित नाही) यांची मोपेड ॲक्टीव्हा क्रमांक (एमएच-19 डीडी 1133) या गाड्यांचे देखील नुकसान केले आहे. याबाबत शहर पोलीसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content