Home Cities जळगाव गुलाबराव पाटील यांच्या संवादाला जनतेचा प्रतिसाद

गुलाबराव पाटील यांच्या संवादाला जनतेचा प्रतिसाद


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून निवडणूकी लढवित आहे. त्यांनी मतदार संघातील जनतेशी संवाद साधायला सुरूवात केली आहे. आज जळगाव तालुक्यातील कुसुंबा व परिसरात त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅलीसह चौकाचौकात थांबून ग्रामस्थांशी संवाद साधला आहे. यावेळी जनतेकडून प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले.

याप्रसंगी माजी महापौर ललित कोल्हे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, सरिता कोल्हे – माळी, जि.प. चे उपाध्यक्ष लालचंद पाटील होते. चिंचोली, धानवड, आणि कुसुंबा परिसरात गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासाचे प्रत्यक्ष परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहेत. या परिसरात निघालेल्या भव्य रॅल्यांमध्ये स्थानिक सेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, देविदास कोळी, विजय लाड, भाजपाचे हर्षल चौधरी, मनोहर पाटील, रघुनाथ चव्हाण, नाना वाघ, गोकुळ महाजन, मयूर महाजन संजय घुगे, जितु घुगे, अतुल घुगे,मनोज घुगे, मिलिंद लाड , जितु पोळ, ब्रिजलाल पाटील, संभाजी पवार, राजू पाटील, शिवा मांडे, विलास घुगे, शिवाजी मांडे, संदीप बिर्हाडे, योगेश सोनावणे, सुनील लाड, संदीप लाड, नंदूआबा पाटील, बबलू पाटील, कैलास बिर्हाडे , प्रवीण पाटील, सरपंच यमुनाबाई ठाकरे, भारतीताई पाटील, निलेश ठाकरे, आकाश पाटील, भूषण पाटील, ज्योतीताई पोळ, ज्योतीताई शिवदे, अंकुश मोरे , कैलास कोळी, चंद्रकांत पाटील, फिरोज तडवी, विजय पाटील, मगन पाटील, रायपूर येथील सरपंच रजनीताई सपकाळे, प्रवीण परदेशी, सिताराम परदेशी, राजेंद्र परदेशी पुष्पाबाई परदेशी, चेतन परदेशी यांच्यासह परिसरातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिलांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound