राहूल गांधींच्या सभेला निषेध करण्यापुर्वीच मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखले !

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यविर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याने राज्यात सर्वत्र पडसाद उमटत आहे. शेगाव येथे आज होणाऱ्या सभेला निषेध करण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना चिखली फाट्यावरच स्थानिक पोलीसांनी रोखून धरले होते. यावेळी राहूल गांधी यांच्या विरोधात तिथेच आंदोलन करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. राज्यातील एका कार्यक्रमात राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यविर सावरकर यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्याबद्दल संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या अनुषंगाने आज शेगाव येथे होणाऱ्या सभेला काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यासाठी चिखली फाट्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते दाखल झाले होते. दरम्यान, स्थानिक पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखून धरले होते. मनसेचे संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई १०० ते १५० कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलीसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मनसेच्या वतीने तीव्र निषेध करत तिथेच आंदोलन करण्यात आले.

Protected Content