Home amalner कळमसरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बारामती व राळेगण सिद्धीस सदिच्छा भेट

कळमसरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची बारामती व राळेगण सिद्धीस सदिच्छा भेट

0
148


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी बारामती, राळेगण सिद्धी आणि पाटोदे गावांना सदिच्छा भेट देऊन तेथील विकास मॉडेलचा अभ्यास केला. विशेषतः शैक्षणिक सुधारणा, स्थानिक विकास आणि सामाजिक न्याय यासंदर्भात त्यांनी माहिती घेतली.

यावेळी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली. या चर्चेत त्यांनी युवकांच्या कार्यकौशल्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांना विकास प्रक्रियेत अधिक सक्रिय होण्याचे आवाहन केले.

प्रतिनिधी मंडळात सरपंच जगदीश निकम, उपसरपंच पिंटू भाऊ राजपूत, सदस्य हेमंत चौधरी, जगदीश कुंभार, गणेश चौधरी, शशिकांत बडगुजर, दिनकर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विकसित गावांचा घेतलेला अनुभव हा भविष्यातील विकास कामांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त केले.


Protected Content

Play sound