मालधक्का पाळधीत नव्हे तर शिरसोलीत होणार ! – ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । भाजप नेत्यांनी जळगावचा मालधक्का पाळधी येथे होणार असल्याचे सांगितले असतांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मात्र हा धक्का शिरसोली येथे होणार असल्याची माहिती दिली आहे.

जळगाव शहरातील मालधक्क्याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या अनुषंगाने हा मालधक्का स्थलांतरीत करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जळगावातील मालधक्का पाळधी येथे स्थलांतरीत करण्यास होकार देण्याचे आ. गिरीश महाजन यांच्या गोटातून सांगण्यात आले होते.

पाळधी येथील संबंधित जागा वन विभागाची असल्याने पर्यावरणाची परवानगी आवश्यक आहे. या अनुषंगाने माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह खासदार उन्मेष पाटील व व्यावसायिक सुनील झंवर यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतल्यानंतर मालधक्का स्थलांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. तथापि, आता मात्र यात थोडा ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा मालधक्का आता पाळधीऐवजी शिरसोली येथे होणार असल्याचे म्हटले आहे. मालधक्का स्थलांतरीत करण्याचा निर्णय हा केंद्र आणि रेल्वेच्या अखत्यारीतील हा विषय आहे. पाळधी वा शिरसोली या दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी मालधक्का झाला तरी ही गावे आपल्याच मतदारसंघातील असल्याचेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

 

गुलाबराव पाटील, gulabrao patil, minister gulabrao patil, jalgaon, jalgaon latest news, jalgaon, jalgaon railway,

Protected Content