गुड शेपर्ड स्कुलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे रंगत

snehsammelan

धरणगाव, प्रतिनिधी | येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी केलेल्या सुप्त गुणांच्या प्रदर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सालाबादप्रमाणे यावर्षीही जी.एस.ए. येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा रंगतदार कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगावचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा.व्ही.आर. पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.व्ही.जी. पाटील प्राथमिक विद्यालय धरणगावचे मुख्याध्यापक बळवंत पाटील व प.रा. विद्यालय धरणगावचे मुख्याध्यापक बी.एन.चौधरी होते. व्यासपीठावर शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित हे उपस्थित होते. प्राचार्या रावतोळे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच आगामी काळातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

सांस्कृतिक कार्यक्रमात विविधांगी परफॉर्मन्सचा समावेश होता. यामध्ये भारताच्या विविध राज्यातील संस्कृतींचे दर्शन, विविध प्रकारचे नृत्यप्रकार त्यात – लावणी, कथकली, गरबा, देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक नृत्य, आधुनिक डान्स, वेस्टर्न डान्स , कॉमेडी डान्स आदी प्रकार समाविष्ट होते. नृत्याचे बहारदार परफॉर्मन्स झाल्यानंतर काही महत्वपूर्ण विषयांवर आधारित थीम डान्स पण सादर करण्यात आले. त्यात पालकांविषयी आदरभाव व्यक्त करणारी एक सुंदर थीम सादर करण्यात आली. पुलवामा आणि उरी च्या हल्ल्याच्या संदर्भात एक थीम डान्स सादर करून शहिदांना आदरांजली देण्यात आली. गमतीदार शाळा कशी असावी यावर एक विनोदी नाटक प्रदर्शित झाले. देशाची आभासी प्रतिमा आणि देशाच्या वास्तव स्थितीवर भाष्य करणारे पथनाट्य सादर करून सामाजिक संदेश देण्यात आला.

डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या देखण्या कार्यक्रमाच्या बद्दल सुंदर पध्दतीने विश्लेषण व मांडणी आमच्या शाळेतील नक्षत्रा पाटील, दीपेश चव्हाण, सनी चौटे, अथर्व तिवारी, कौस्तुभ महाजन, कल्याणी माळी, प्राजक्ता बाविस्कर, विधी गुप्ता, आर्या जैन, सानिका मराठे, दर्शन भोसले, प्रथमेश मिसर, राजश्री पाटील, अंजली कोळी, दिपश्री चौधरी या विद्यार्थ्यांनी केली. कार्यक्रमाला गावातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष सूर्यवंशी , रिबेका फिलिप, भारती तिवारी, अनुराधा भावे, रमिला गावित, ग्रीष्मा पाटील, स्वाती भावे, पूनम बाचपाई, पूनम कासार, शिरीन खाटीक, दामिनी पगारीया, नाजूका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, नाजनिन शेख, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल श्रीमावळे (सोनार), सागर गायकवाड, सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल देशमुख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी तर आभार प्रदर्शन ग्रीष्मा पाटील यांनी केले.

Protected Content