पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल मध्ये रंगला ‘रीझोनन्स’ सांस्कृतिक कार्यक्रम

WhatsApp Image 2019 12 21 at 8.08.28 PM

चोपडा, प्रतिनिधी | पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चा रीझोनन्स २०१९ सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी उल्लेखनिय यश
मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

रीझोनन्स २०१९ सांस्कृतिक कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक पंकज बोरोले हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे जि. प. आरोग्य सभापती दिलीप पाटील, कँनरा बैंक शाखा अधिकारी निकुंज परमार ,एल.आय.सी शाखा अधीकारी धुपेकर, प्राचार्य सुभाष, बोहरा सेंट्रल स्कूल पारोळा चेअरमन सुरेंन्द्र बोहरा, अमरीश आर पटेल स्कूल शिरपुर प्राचार्य निचल नायर, अँड.ललीता पाटील स्कूल अमळनेर प्राचार्य विकास चौधरी, सेंट्रल स्कूल पारोळा प्राचार्य सोनी बोहरा, एस. एल. चौधरी स्कूल जळगाव प्राचार्य चेतना नन्नवरे उपस्थित होते.गुणवंत यादीत प्रथम आलेले विद्यार्थी,कराटे तसेच सर्व शालेय उपक्रम व परीक्षेत गुणवंतांना प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते पारितोषीक देत त्यांचा गौरव करण्यात आला. नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मराठी,हिंदी गीत गायनाचे सादरीकरण केले. जम्मू काश्मिर ते कन्याकुमारी संपुर्ण भारताचे सांस्कृतिक दर्शन हे विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून सादर केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत “छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या जन्मापासून संपूर्ण कार्यकिर्द पोवाडेच्या माध्यमातून सादर करण्यात आले. मराठी, हिंदी, राजस्थानी, खानदेशी अहिराणी या सर्व भाषा प्रांतातील संस्कृतीचे दर्शनपर नृत्य, देश भक्ती पर गीत भाव गीतांनी सर्व पालकांचे लक्ष वेधले. स्त्री अत्याचारावर लढा देण्यासाठी नृत्यांद्वारे जनजागृती करत सामाजिक सलोखा राखण्याचा संदेश देण्यात आला. सूत्रसंचालन विद्यार्थिनी निधी चौधरी व मिहिका अग्रवाल यांनी केले. संस्थेचे सर्व पदाधिकारी व विभाग प्रमुख यांची उपस्थिती लाभली.संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्राचार्य मिलिंद पाटील यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख गिरीष महाजन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परीश्रम घेतले.

Protected Content