मुंबई वृत्तसंस्था । रेल्वेत काम करण्यास इच्छुक असणा-यांसाठी खुशखबर आहे. दक्षिण मध्य रेल्वेने (एससीआर) प्रशिक्षु (अप्रेंटिस) पदाच्या रिक्त जागांसाठी नोकर भरती सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर आहे. या भरती परीक्षेच्या माध्यमातून एकूण ४ हजार १०३ पदे भरली जाणार आहेत.
विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता दहावील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. कमाल वयोमर्यादेत एससी/एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
वय:-
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 15 वर्षे असावे. त्याच वेळी, कमाल वय 24 वर्षे आहे. तसेच अनुसूचित जाती-जमाती उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत पाच वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
अर्ज फी:-
अनुसूचित जाती/जमाती/महिला/पीडब्ल्यूडी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.
इतर सर्व उमेदवारांना 100 रुपये फी भरावी लागेल.
निवड प्रक्रिया:-
गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
शैक्षणिक पात्रता:-
उमेदवारांची किमान शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या पदांनुसार विहित केलेल्या इतर पात्रतांविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवरुन सूचना डाऊनलोड करुन वाचा.
महत्त्वाच्या तारखा:-
अर्ज सादर करण्याची प्रारंभ तारीख: 09 नोव्हेंबर, 2019
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीखः 08 डिसेंबर 2019 (रात्री 23:30 पर्यंत)
संकेतस्थळास भेट:-
http://104.211.221.149/instructions.php