क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर ! सचिन अन लारा पुन्हा उतरणार मैदानात

sachin tendulkar brian lara

मुंबई प्रतिनिधी । क्रिकेटमध्ये 90च्या दशकापासून फक्त दोन नावे चाहत्यांच्या मनावर कोरली गेली होती. कॅरेबियन किंग ब्रायन लारा तर दुसरा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव होते. लाराने 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तर, सचिनने 2013मध्ये निवृत्ती घेतली. त्या दिवसापासून क्रिकेट चाहते या दोन्ही दिग्गजांना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात पाहण्याची आतुरतेने वाट पाहत असून लवकरच चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.

२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान मुंबईमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. इंडिया लिजंड्स, ऑस्ट्रेलिया लिजंड्स, दक्षिण आफ्रिका लिजंड्स, श्रीलंका लिजंड्स आणि वेस्ट इंडिज लिजंड्स अशी या सगळ्या टीमची नावे आहेत. या स्पर्धेसाठी एकूण ११० खेळाडू सहभागी होणार आहेत, यातले सगळे खेळाडू हे निवृत्त आहेत. टी-२० लीगसारखीच ही स्पर्धा होणार आहे. पहिल्या मोसमात फक्त टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या खेळाडूंनाच सहभागी करून घेण्यात आलं आहे.

पुढच्या १० वर्षांमध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात या स्पर्धेचं आयोजन करण्याचा आयोजकांचा मानस आहे. ऑगस्ट २०१८ मध्येच बीसीसीआयकडून या स्पर्धेला परवानगी देण्यात आली होती. खेळाडूंचं मानधन फ्रॅन्चायजी देणार आहेत, तर स्पर्धेतून होणारा नफा रस्ते सुरक्षा अभियान चालवण्यासाठी वापरण्यात येणार आहे. २०१३ साली सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली होती. यानंतर २०१४ साली लॉर्ड्सच्या मैदानात सचिन एमसीसीकडून जागतिक-११ टीमविरुद्ध खेळला होता. २०१५ सालीही अमेरिकेत एका मॅचमध्ये सचिन खेळला होता.

Protected Content