गोलाणी मार्केटमधून पुन्हा दुचाकी चोरी

two wheelar thift

जळगाव प्रतिनिधी । शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोलाणी मार्केटमधून दुचाकी चोरी होण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले असून रविवारी भरदिवसा दुपारी 5 वाजेच्या सुमारास एक दुचाकी लंपास केल्याची घटना घडली आहे. गेल्या महिन्याभरात दुचाकी चोरीचे प्रमाण कमी झाले तोच पुन्हा चोरट्यांनी हात साफ करण्यास सुरूवात केली आहे.

भरदिवसा चोरली दुचाकी
सुनंदिनी पार्कमध्ये राहणारे विजय माधव नेवे हे दै.उज्ज्वल स्वतंत्र भारतमध्ये कामाला आहे. दि.28 रोजी दुपारी 2 वाजता त्यांनी स्वतःच्या मालकीची दुचाकी क्रमांक एमएच.19 बीआर.3478 ही गोलाणी मार्केटच्या ए विंगमधील पार्कींगला लावली. रात्री 8 वाजेच्या सुमारास ते कार्यालयीन काम आटोपून खाली उतरले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. याप्रकरणी नेवे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

चोरटा सीसीटीव्ही कैद
शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सुनील पाटील, गणेश पाटील, रतन गिते, तेजस मराठे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेज कुरीअर आणि अंजनी कुरीअरच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दुपारी 4.29 ते 4.46 दरम्यान सर्व प्रकार कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्याचा शोध सुरू आहे.

Protected Content