ध्येय व चिकाटी हीच यशाची पायरी –गोकुळ बोरसे

अमळनेर प्रतिनिधी । यश अपयश हे नशिबावर अवलंबून नसून ते ध्येय्य व चिकाटीवर अवलंबून असते.यासाठी कुठल्याही क्षेत्रात ध्येय्य निश्चित असल्याने यशाची पायरी आपोआप चालत येते असे प्रतिपादन शेतकी संघाचे माजी चेअरमन गोकुळ बोरसे यांनी केले. ते कळमसरे ता.अमळनेर येथे पिकविम्याचा लाभ मिळवून देणाऱ्या शेतकऱ्याच्या सत्कार समारंभात बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच प्रल्हाद महाजन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून गडखांब येथील गोकुळ बोरसे,निम्भोरा येथील कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र राजपूत यांची उपस्थिती होती.
मागील वर्षी रब्बी हंगामात मंजूर झालेला पीकविम्यात अमळनेर तालुक्यातील अठरा गावाची नावे गायब झाल्याने शेतकरी पीकविमा लाभापासुन वंचित राहिले होते. परिणामी तालुक्यातील शेतकरी यात गोकुळ बोरसे,सुरेश पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, अंबालाल राजपूत,प्रा.हिरालाल पाटील,नत्थू चौधरी,किरणसिंग राजपूत,झुलाल चौधरी, भिकेसिंग राजपूत,रणजीतसिंग राजपूत,जी. टी.माळी,मुरलीधर चौधरी,जितेंद्र महाजन,अरुनसिंग राजपूत,हिरालाल महाजन कडू चौधरी,धनराज चौधरी ,मंगलसिंग राजपूत,गुलाब चौधरी आदी शेतकरीनी जिल्हाधिकारी ,जिल्हा बँक,मंत्रालय ते कृषीमंत्री यांच्याकडे सखोल पाठपुरावा करीत तीव्र लढा दिला होता. अखेर जळगाव जिल्ह्यातील व तालुक्यातील अठरा गावातील शेतकऱ्यांना 19 कोटी तर कळमसरे गावाला 86 लाख 34 हजार रुपयांचा पिक विमाचा लाभ मिळाला. यामुले कळमसरे येथील शेतकरी बांधवानी पिकविमा मिळविण्यासाठी अमळनेर तालुक्यातुन परिश्रम घेणारे गोकुळ बोरसे ,सुरेश पाटील यांचासह कळमसरे येथील शेतकरयाचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Add Comment

Protected Content