जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोजराई फाउंडेशनच्या वतीने जगवानी नगर येथे “महापुरुषांची जयंती, विचारांची जयंती” या विशेष उपक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
या प्रसंगी उपस्थितांना प्रेरणा देणारे विचार सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा”, महात्मा फुले यांचे “शिकणं हेच खरं स्वातंत्र्य आहे”, राजर्षी शाहू महाराजांचे “समाजातील तळागाळातील व्यक्तींना शिक्षण देणे ही खरी सेवा आहे” आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे “रयतेचा राजा होणे हेच खरे राजेपण आहे.” – या विचारांनी सभा मंडप भारावून गेले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदारराजूमामा भोळे हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार गोजराई फाउंडेशनचे अध्यक्ष मा. नितीन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या भाषणात आमदार भोळे यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्व अधोरेखित केले.
कार्यक्रमास इतर मान्यवरांमध्ये एपीआय वाघ सर (एमआयडीसी पोलीस स्टेशन), मा. श्री. चंद्रकांत सोनगीरे (नि. शहर अभियंता जळगाव), केशव सुरवाडे (नि. पो. SI म.पो.), मा. डॉ. विरन खडके, मा. सुनीलजी खडके, विजयजी वानखेडे, संदीप सुरळकर (नि. भारतीय सेना, उ.प. तालुका प्रमुख शिवसेना), दिपक सपकाळे (RPI आठवले गट), तसेच विजय शर्मा, संजय ठाकरे, कृष्णा चौधरी, आबा देसले, बिर्लाजी, मनोज राठोड, प्रशांत पाटील, प्रल्हाद निकम, ललित बंटी शर्मा, सुभाष आमोदकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात दर्श सुरळकर यांनी महापुरुषांच्या विचारांवर आधारित स्वगत सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. सूत्रसंचालन दिपक सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन गोजराई फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन गायकवाड यांनी केले. गोजराई फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये विचारशीलतेला चालना मिळाली असून, या कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव अधोरेखित झाली.