गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची बी.एस्सी. नर्सिंग निकालात उत्कृष्ट कामगिरी!

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्यातर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी. नर्सिंग हिवाळी ५ व्या सेमिस्टरच्या निकालात जळगावच्या गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचा निकाल तब्बल ९८.५७% लागला असून, संस्थेने आपल्या उच्च दर्जाच्या शिक्षणामुळे आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

बी.एस्सी. नर्सिंग ५ व्या सेमिस्टरमध्ये आकांक्षा काळे हिने ७६.५७% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर आचल मिल्के हिने ७४.५७% गुणांसह द्वितीय आणि कल्याणी शहाणे हिने ७४% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय, ऋतुजा शेंडे, तेजल हिवराळे आणि आचल मेश्राम या तिघींनी ७३.७१% गुण मिळवत संयुक्तपणे चौथा क्रमांक मिळवला. गायत्री सुरेशे हिने ७२% गुणांसह पाचवा क्रमांक आपल्या नावे केला.

या शानदार यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव वर्षा पाटील, संचालक डॉ. केतकी पाटील आणि डॉ. वैभव पाटील, प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, उपप्राचार्य प्रा. जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमासोबतच शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि संस्थेच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे हे यश शक्य झाले, असे संस्थेने म्हटले आहे.

Protected Content