Home क्राईम लघुशंका करण्यावरून रिक्षाचालकावर चाकूहल्ला

लघुशंका करण्यावरून रिक्षाचालकावर चाकूहल्ला

0
118

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावाजवळील मन्यारखेडा फाट्याजवळ लघुशंका करण्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकाला दोन जणांनी शिवीगाळ करत धारदार शास्त्राने पोटावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी २१ एप्रिल रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, निखिल धनराज अहिरे वय-२१, रा. मण्यारखेडा ता.जळगाव हा पण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून रिक्षा चालवतो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी २० एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मन्यारखेडा फाट्याजवळ लघुशंका केल्याच्या कारणावरून संजय कासार आणि कृष्णा संजय कासार दोन्ही रा.मन्यारखेडा या दोघांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने पोटावर वार करून गंभीर दुखापत करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निखिल अहिर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे संजय कासार आणि कृष्णा कासार या दोघांवर नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहे.


Protected Content

Play sound