जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचालित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयात रास-दांडिया 2022 उत्साहात पार पडला.
नवरात्रोत्सवात सर्वत्र गरबा, दांडियाची धूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या आवारात रास-दांडिया घेण्यात आला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी कार्यक्रमाची सुरवात देवीच्या प्रतिमेस पुष्पहार, श्रीफळ अर्पण करून केली. उपस्थितांना संबोधताना त्यांनी सांगितले की नवरात्र हा नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव असून सर्वत्र आनंद, उत्साह दिसून येतो. देवीच्या शक्तीरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते. देवीने नवरात्रीचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. ज्या शक्तीचे, सामर्थ्याचे दर्शन देवीने घडविले आहे तसेच सामर्थ्य, शक्ती आपल्या ठायी निर्माण झाली पाहिजे जेणेकरून जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर न डगमगता त्यास सामोरे जाऊन मात देत येईल.
या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या बी.बी.ए, बी.सी.ए, एम.बी.ए च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपारीक वेश धारण केलेला होता. यावेळी दांडिया किंग, दांडिया क्वीन, बेस्ट दांडिया कपल, बेस्ट ड्रेस इत्यादी साठी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. महाविद्यालयाच्या रॉक गार्डन मध्ये संध्याकाळी हा कार्यक्रम रंगला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक अशा बहारदार गाण्यांवर गरब्याच्या ताली खेळल्या. यावेळी दांडिया किंग ऋषिकेश शिंदे, दांडिया क्वीन प्रणाली माळी, बेस्ट कपल भूमिका नाले, प्रणव रायसिंग, बेस्ट ड्रेस पारस सपकाळे व योगेश्वरी जैतकर, बेस्ट दांडिया सजावट कावेरी व हर्षा माळी यां विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये बक्षिसे पटकावली.
सजावटीचे काम प्रा. योगिता यांनी पाहिले. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. वैजयंती असोदेकर यांनी पाहिले. सर्व स्पर्धांसाठी परिक्षकांचे काम महाविद्यालयाच्या डॉ. नीलिमा वारके व प्रा. मिताली शिंदे यांनी पाहिले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.