दुर्गा देवीच्या वाजत- गाजत विर्सजनास परवानगी द्या – मनसेची मागणी

यावल, प्रतिनिधी | संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो.  मात्र, मागील वर्षी कोरोना काळ असल्याने हा उत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता, यावर्षी परिस्थितीत सुधारणा झाल्याने  दुर्गा देवीच्या  वाजत- गाजत विर्सजनास परवानगी द्यावी अशी मागणी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी  केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  खान्देशात नवरात्र हा हिंदू धर्मातील एक मोठा उत्सव आहे. संपुर्ण भारतात व महाराष्ट्रात नवरात्र उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. तसेच मागील वर्ष कोरोना काळ होता त्यामुळे साध्या पध्दतीने नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना स्थिती चांगली व योग्य ते नियम पाळून साजरी करण्यात येईल. परंतु, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांना विर्सजनाच्या दिवशी वाजत गाजत वाजंत्रीची परवानगी देण्याचे आदेश पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सर्व नियम पाळून २०० लोकांची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खान्देशच्या सर्व मंडळाच्या वतीने मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी  केली आहे.

 

Protected Content