मुलींचा गोदावरी नर्सिंग संघ “पायरेक्सीया ट्रॉफी”चा उपविजेता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशनतर्फे आयोजित गोदावरी क्रिकेट लीग २०२५ मध्ये गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर पायरेक्सीया ट्रॉफीचे उपविजेतेपद पटकावत खेळभावना आणि संघभावनेचे उत्तम उदाहरण सादर केले. स्पर्धेतील अंतिम सामना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘अगस्त्या बॅच’ विरोधात रंगला. दोन्ही संघांत कडवी झुंज पाहायला मिळाली. निर्णायक क्षणी विद्यार्थिनींनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गोदावरी नर्सिंग संघ आपली विजयाची मालिका अखंड ठेवत पुढे सरसावत गेला. अंतिम फेरीतही त्यांनी कसोशीने खेळ केला आणि उपविजेतेपदावर आपले नाव कोरले. संघातील खेळाडू सौंदर्या पटेल हिने अपूर्व कामगिरी करत “मालिकावीर” हा बहुमान पटकावला. या यशानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य प्रा. विशाखा गणवीर, उपप्राचार्य प्रा. जसनीत दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, प्रा. पियुष वाघ, प्रा. प्रियंका गवई, प्रा. अभिजीत राठोड आणि प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक करत त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. विजेत्या संघाला सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. या यशामुळे महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींमध्ये भविष्यातील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण झाली आहे.

Protected Content