‘त्या’ तरूणाचा खून नव्हे, अपघाती मृत्यू !

jalgaon crime enws

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील ई-सेक्टरमध्ये एका तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. मात्र हा घातपात नसून आपघाती मृत्यू असल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शरद उर्फ भैय्या विठ्ठल कोळी (वय-31) रा. राममंदीर कोळीपेठ असे मयताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, शरद उर्फ भैय्या विठ्ठल कोळी हा मोठा भाऊ मुकेश कोळी याला सावदा येथे मित्राच्या लग्नाला जावून येतो असे सांगून बुधवार 27 रोजी सायंकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडला होता. दरम्यान काल गुरूवार सायंकाळी 6 वाजता मित्रांसोबत जळगाव-भुसावळ रोडवरील हॉटेल गौरव येथे दारू पिण्यासाठी गेला. त्यावेळी शरदचे काही मुंबईतील मित्र देखील उपस्थित होते. रात्री उशीरापर्यंत बेसुमार दारू प्यायले असल्याने शरदने मित्रांची पल्सर दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीएन 7772) घेतली. त्यावेळी त्याने मित्रांला वाल्मिक नगर येथे सोडून पुन्हा एमआयडीसीकडे निघाला. रात्री दुचाकीवरून जावू नको असे काही मित्रांनी शरदला सांगितले होते. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. एमआयडीसी ई-23 सेक्टरमधील पॅराडाईज कंझुमार प्रॉडक्ट लिमीटेड कंपनीसमोरील बाजूस सकाळी 4 वाजता मयतस्थितीत आढळून आला. त्यावेळी त्याच्या डोक्याला, हाताला, उजव्या पायाला, खरचटले होते. दरम्यान कंपनीच्या वॉचमनला ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने एमआयडीसी पोलीसांना फोन करून घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विशाला वाठोरे यांनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.

नातेवाईकांची जिल्हा रूग्णालयात प्रचंड गर्दी
यावेळी शरद कोळीचा मृत्यू झाल्याची वार्ता नातेवाईक व मित्रांना मिळाल्यानंतर जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात प्रचंड गर्दी जमली होती. दरम्यान, शरदचा हा अपघात नसून त्याला अज्ञात हल्लेखोरांनी खून केल्याचा संशय मयत शरदचा मोठा भाऊ मुकेश याने व्यक्त केला आहे. मात्र घटनास्थळवरील पुरावे व पाहणी करण्यात आली आहे. हा खून किंवा घातपात नसून दुचाकीवरून पडून डोक्याला मार लागला आहे. त्यानुसार अतिरक्तस्त्राव झाल्याने त्याला जागीच मृत्यू झाला असावा, पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचे म्हणणे आहे. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शरद कोळी हा खासगी वाहन चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई मंगलाबाई, भाऊ, पत्नी दिपाली, दीड वर्षाचा मुलगा जयदीप आणि चार वर्षाची मुलगी देवयानी असा परीवार आहे.

Protected Content