उद्धव ठाकरेंनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार

72271502

 

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. दरम्यान, दभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते. गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिल्या व्यक्तीने शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे, आज फक्त शुभेच्छा देऊयात, कोणतेही इतर भाष्य नको, असे म्हणत बोलणे टाळले. तर दुसरीकडे उद्धव यांच्या स्वागतासाठी मंत्रालयात अनेक नेते आणि अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

Protected Content