धावत्या रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू

death young 20180696727

जळगाव प्रतिनिधी । पेंटीगच्या कामासाठी भुसावळला जाणाऱ्या प्रवाशाचा रेल्वेमधून पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या संदर्भात तालुका पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुधीर बळीराम अडकमोल (वय ४३, रा. गेंदालाल मिल) हे कंत्राट पद्धतीने इमारतीला रंग मारण्याचे काम. मिळेल ते काम घेऊन आपला परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. ते आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास भुसावळ येथे रंगकाम करण्यासाठी निघाले होते. मात्र, ६ ते ८ वाजेच्या दरम्यान त्यांचा रेल्वे असोदा रेल्वे गेट जवळ पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सुधीर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे.

Protected Content