गोदावरी फाऊंडेशन मुख्य प्रायोजित लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो २०२२ चे उद्या उद्घाटन (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  गोदावरी फाऊंडेशन मुख्य प्रायोजित लेवा पाटीदार ग्लोबल सोशल फाऊंडेशन आणि लेवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्या संयुक्‍त विद्यमाने तीन दिवसीय लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या एक्स्पोचे  उद्घाटन उद्या सायंकाळी ७ वाजता करण्यात येणार असल्याचे गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी पत्रकार परिषेदेत दिली.

 

लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो २०२२चे उद्घाटन  उद्या शुक्रवार दि. ३० सप्टेंबर रोजी  आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, आमदार राजुमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महापौर जयश्री महाजन, वेगा केमिकल्स डायरेक्टर भालचंद्र पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दि. ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या कालावधीत सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सागर पार्क मैदानावर लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष  नंदकिशोर बेंडाळे,  राजीव चौधरी,  के. सी. पाटील,  महेश चौधरी,  गोदावरी फाऊंडेशन सदस्य डॉ. केतकी, डॉ. वैभव पाटील,  जीवन येवले, जळगाव पीपल्स को-ऑप बँक चेअरमन अनिकेत भालचंद्र पाटील,    रविंद्र अत्तरदे,   चंदन अरुण नारखेडे  यांची विशेष उपस्थीती राहणार आहे.

या बिझनेस एक्स्पोअंतर्गत १५० स्टॉल्स असणार असून त्यात कार्डियाक कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये हृदयविकाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेली हृदयाची सोनोग्राफी अर्थात टू डी इको तपासणी, ईसीजी कार्डिओग्राफ,  बीपी तपासणी मोफत केली जाणार आहे.  याशिवाय सर्व व्यावसायिक बांधव-भगिनींच्या स्टॉल्सला भेट देऊन प्रोत्साहनही द्यावे.

या पत्रकार परिषदेप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष दादा पाटील, डॉ.केतकीताई पाटील, लेवा पाटीदार बिझनेस एक्सपोचे रविंद्र चौधरी, चंदन कोल्हे, नितीन इंगळे, चंदन अत्‍तरदे, जयश्री पाटील, बिपीन पाटील, भुषण बढे, पवन भोळे, रविंद्र पाटील, रुपेश सरोदे आदि उपस्थीत होते.

 

Protected Content