सामनेरात सर्वोदय संस्थेकडून ‘स्मृतीवन’ साकारले जाणार

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सामनेर येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हरीत निर्माण उपक्रमांतर्गत अमरधान कब्रस्थान व गोसावी समाज दफनभूमी परिसरात नदीच्या काठावर वटवृक्ष लागवड करून स्मृतीवन साकारले जाणार आहे. 

तालुक्यातील सामनेर येथील सर्वोदय बहुउद्देशिय संस्थेच्या पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पनेतून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी सातत्याने अभिनव संकल्पनांच्या माध्यमातून पाऊल उचलले जाते. यावर्षी १ जुलै २०२१ कृषि दिनापासून संस्थेच्या “हरित निर्माण” उपक्रमांतर्गत  रस्त्याच्या दुतर्फा “वटवृक्ष” लागवड करत “स्मृतीवन” साकारले जात आहे.

स्मृतीवनात कृषि दिनाचे औचित्य साधत कृषि संस्कृतीत आपले आयुष्य वेचलेल्या पूर्वज, वाडवडील, मातृ-पितृ तसेच प्रियजन यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांचे स्वकीयांकडून वटवृक्ष लागवड करण्यात येऊन सुरुवात करण्यात आली.स्मृतीवनात २०० झाडांचा प्रकल्प संस्था व गावातील विविध स्थरातील सर्वधर्मीय समाज घटकांकडून या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी यशस्वी काम उभं केलं जाणार आहे. गावातील नौसेनेत, सैन्यसेवेत, पोलिस सेवेत असणाऱ्या तसेच विविध पदावर कार्यरत समाज घटकांकडून वेळोवेळी उपक्रमास भरीव योगदान लाभत आहे.

सर्वोदय “हरित निर्माण” उपक्रम अंतर्गत बारमाही वृक्ष लागवड केली जाते. समाजातील विविध घटकांच्या सहयोगावर हा उपक्रम जोमाने चालू असून यास सर्वोदय युवा स्पंदन केवळ इव्हेंटचे स्वरूप देत नसून लागवड केलेली झाड जगविलीच जातात व त्यावर अधिक भर असतो. आजतागायत लावलेली हजाराहुन अधिक झाड १० ते १५ फुटांपर्यंत व त्यापेक्षा अधिक वाढलेली असून डौलदार झालेली आहेत.

Protected Content