जळगाव, प्रतिनिधी | जिल्हा क्रीडा संकुलात शुक्रवारी झालेल्या मनपा स्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेत १४,१७ व १९ वयोगटातील मुलं व मुली यांच्या हॉकीच्या स्पर्धा हॉकी जळगाव व जळगाव शहर महापालिका यांच्या माध्यमाने घेण्यात आल्या. या स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम शाळेने १४ वर्ष मुलं व मुली तसेच सतरा वर्ष मुलं व मुली या चारही गटात विजेतेपद पटकाविले.
अँग्लो उर्दू हायस्कूल ने १९ मुले व बेंडाळे महाविद्यालयाने १९ वयोगटात विजय संपादन केला. सर्व विजयी उपविजयी तसेच उत्कृष्ट खेळाडूंना स्पोर्ट्स हाऊस तर्फे अमीर शेख यांनी ट्रॉफी व मेडल देऊन खेळाडूंचा गौरव केला. प्रमुख अतिथी म्हणून राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. भागवत, मध्य रेल्वेचे भारतीय संघाचे अकील शेख, बुद्धिबळ संघटनेच्या अॅड. अंजली कुलकर्णी, हॉकी महाराष्ट्राच्या सहसचिव प्रा. डॉ. अनिता कोल्हे, व हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडु
मुझममिल अली(अँग्लो), सानिया अवचरे (गोदावरी), जयेश मराठे(गीदावरी),मिझान शेख(अँग्लो) उत्तेजनार्थ -तहेनियत शेख(इकरा)
१४ वर्षाआतील मुले उपांत्य सामना : अँग्लो उर्दू वि वि इकरा उर्दू (२-०) पेनल्टी अंतिम सामना : गोदावरी वि वि अँग्लो उर्दू (१-०) १४ वर्षाआतील मुली अंतिम सामना : गोदावरी वि वि इकरा उर्दू (१-०) १७ वर्षाआतील मुले : युनिक उर्दू वि वि मिलत उर्दू (१-०) उपांत्य सामने : गोदावरी वि वि अँग्लो उर्दू (२-०) युनिक उर्दू वि वि इकरा उर्दू (१-०) अंतिम सामना : गोदावरी वि वि युनिक उर्दू (१-०) १७ वर्षाआतील मुली अंतिम सामना : गोदावरी बिनविरोध १९ वर्षाआतील मुले अंतिम सामना : अँग्लो उर्दू वि वि मिलत उर्दू (३-२) १९ वर्षाआतील मुली डॉ ए जी डी बेंडाळे महाविद्यालय बिनरोध
स्पर्धेत पंच म्हणून लियाकत अली, अब्दुल मोहसीन, झुबेर खान,मजाझ खान, शोएब अली,अल्तमश शेख, मिरान शेख, इम्रान शेख आवेश खाटीक यांनी काम पाहिले