जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव, येथे आजपासून क्रीडा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन राष्ट्रीय स्तरावर खेळणारा गोदावरी स्कूलचा विद्यार्थी, गौरव महाजन, याने मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्रोफेसर इंगळे सर, शफिक सर, जाधव सर, स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी, यांच्याहस्ते कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
कार्निवल (आनंद उत्साह), ग्रीन, येल्लो, ब्ल्यू, रेड हाऊस ने नृत्य सादरीकरण केले. यावेळी सर्व हाऊसेस, हाऊस लीडर्स, हाऊस कॅप्टन मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद , उत्साह दिसून येत होता. खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण हे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे हे शिकवतात. खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो, असे विचार डॉ. श्री उल्हास पाटील सर यांनी व्यक्त केले.
खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंतामुक्त करते. खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते. खेळ खेळाडूंना नाव, प्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो. आपल्या मेंदूला, शरीराला आणि आत्म्याला फायदा होतो. डॉ. वर्षा पाटील यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले, त्यांनी प्रत्येक हाऊसचे कौतुक केले प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली बोंडे, दिव्यांका कोलगे, रिध्दी जावळे तसेच आभार प्रदर्शन नारायणी पांडे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. आसिफ सर, पंकज तिवारी, प्रसाद देशमुख क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.