जळगावात कृषी विधेयक विरोधात केलेल्या रास्ता रोको आंदोलनातील ४४ जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी विधेयकांचा विरोधासाठी बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलाजवळ काल शुक्रवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आला. आंदोलनात सहभागी असलेले आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगस मास्क न लावणे व संचारबंदिचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४४ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी केंद्र सरकारविरोधात व अन्याय कारक कामगार कायदे हाणून पडण्यासाठी विरोधी सर्वपक्षिय संघटनेकडून लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बांभोरी पुलाजवळ शुक्रवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनता आंदोलन कर्त्यांकडून चेहर्‍यावर मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणे, गर्दी टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, जमावबंदिचे आदेश असतांना त्याची अंमलबजावणी न करणे. तसेच बेकायदेशीरपणे महामार्गावर एकत्रीत येवून जमाव जमवून दोन्ही बाजूची वाहने अडवून ठेवणे. त्याप्रमाणे कोरोना संसर्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता निष्काळजीपणाने मानवी जिवीतास व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात घालून साथीचा प्रादुर्भाव होईल. असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आंदोलनकर्त्यांवर झाला गुन्हा दाखल
लोकसंघर्ष मोर्चाचे प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्रभैय्या पाटील, अल्पसंख्याक आघाडी प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलीक अब्दुल रज्जाक, राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, माजी उपमहापौर अब्दुल करीम सलार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, विनोद देशमुख, अब्दुल रऊफ अब्दुल रहिम, शेख मोहसीन शेख युसूफ, मोहम्मद फारुख मोहम्मद अली कादरी, शेख तन्वीन शेख मसूद, विकास विठ्ठल चौधरी, शेख उमर शेख फारुख, विक्रम मधुकर पाटील, श्रीकांत तात्या मोरे, उमेश संतोष पाटील, राजेश गोविंदा कोळी, मोहंमद अरबाज अंसार पिंजारी, फारुख खान आयुब खान, विक्की अशोक घोरपडे, फारुख शेख अब्दुल्ला, अल्ताब शेख हुसेन, सैय्यद चॉंद सै. अमीर, स्मिता बाबुराव देशमुख, जमील शेख शफी, गणेश माणिक महाजन, विशाल प्रभाकर वाघ, किरण कडू वाघ, अमोश अशोक कोल्हे, मनोज लिलाधर वाणी, सचिन प्रल्हाद धांडे, नाना सुभाष महाले, प्रमोद बळीराम पाटील, मोहंम्मद शफी शेख अब्दुल्ला, संजय प्रताप चव्हाण, रहिम खान अकिल खान, मुदस्सर शेख मुजाहिद, सलमान खान अजीज खान, अकिल शाख गुलाम खान, हितेश सुभाष पाटील, पराग रविंद्र घोरपडे सर्व रा. जळगाव, सुनिल मार्तंड साळुंखे रा. फैजपूर, मनोज डिगंबर चौधरी रा. आवार ता. जळगाव, नारायण नामदेव चौधरी रा. धरणगाव यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content