मार्केट परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील सातपुडा पेपर डेपो दुकानासमोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याबाबत रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, प्रविण लक्ष्मण सुर्यवंशी वय -३७ रा. दौलत नगर, महाबळ, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता प्रविण सुर्यंवशी हा तरूण त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीआर ३५०१) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील सातपुडा पेपर डेपो दुकानासमोर आला. त्यावेळी त्याने दुचाकी दुकानाच्या समोरच पार्कींग करून कामानिमित्त निघून गेला. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही.अखेर रविवारी १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बशीर तडवी हे करीत आहे.

Protected Content