नवी दिल्ली-वृत्तसेवा | लोकसभेत कामकाज सुरू असताना गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर प्रचंड मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतील एकूण 31 खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.
यातील अनेक खासदारांना संपूर्ण अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी ही सर्वात मोठी कारवाई केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये अधीर रंजन चौधरी, टीआर बालू, दयानिधी मारन यांचा समावेश आहे.