जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यस्तरीय आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्ध साठी १६ वर्षा आतील मुलींचा संघ २२ दिवसाच्या प्रशिक्षणातून निवडण्यात आला एकूण ३५ प्रशिक्षणार्थी मधून अंतिम १८ खेळाडूंची निवड फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी घोषित केली. यावेळी संघटनेच्या कार्याध्यक्ष प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक एडवोकेट आमिर शेख, आकाश परदेशी,उदय फालक आदींची उपस्थिती होती. संघ पालघर साठी आजच रवाना झाला असून १ जून रोजी वर्धा जिल्हा सोबत पहिला सामना खेळला जाणार आहे
निवड झालेला संघ -संस्कृती मनाज मेढे (कर्णधार) अक्षरा मंगेश गोंटला ( उप कर्णधार), अनन्या विजय पाटील, गौरी राजेश पिंगळे, लतिका निकेत अग्रवाल, आर्या विनोद वाघ, हिमानी राजेश देसाई, आभा नितीन पारगावकर, स्वाती रोमबहादूर गुप्ता, हेमाली दिपक भोळे,संस्कृती सचिन बोरसे,महिमा दिपक मोतीरामणी, भूमिका जयसिंग इंगळे, दिक्षीका निलेश पाटील, आर्या विजय सरताळे, अक्षरा सुदाम वाणी, अमृता मनोज चौधरी व जिया राहुल कोळबे (गोलकीपर) राखीव खेळाडू सिद्धी जितेंद्र सपकाळे, ओजस्वी मुकेश पाटील, परी विजय जोगी. संघ व्यवस्थापक पदी पोदार स्कूलच्या क्रीडा शिक्षिका छाया बोरसे, सहाय्यक हिमालि बोरोले, प्रशिक्षक मिल्लत हायस्कूलचे क्रीडा शिक्षक राहील अहमद व रोहिणी सोनवणे यांची निवड फारूक शेख यांनी घोषित केली.