चाळीसगाव प्रतिनिधी । वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे महाराष्ट्र राज्य मुलींच्या कुस्तीगीर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्हा द्वितीय स्थानी राहिला तर संघातील ३ महिला स्पर्धक अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाच्या मानकरी ठरल्या.
यावेळी राज्यातील ४६ जिल्ह्यातील महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदवित आपल्या खेळाची चमक दाखविली यावेळी जळगांव खा.रामदास तडस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना गौरविण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील नंदीनी पाटील हीने ५३ किलो वजनगटात सुवर्णपदक तर धरणगांव तालुक्यातील रेणुका महाजन हीने ४० किलो वजनगटात सुवर्ण पदक मिळविले व पाचोरा तालुक्यातील माया झाडे हीने ६५ किलो वजनगटातून रौप्यपदाची मानकरी ठरली.
यावेळी देवळी येथे झालेल्या स्पर्धेप्रसंगी राज्य कुस्ती परिषद सदस्य सुनिल देशमुख,संजय पाटील,संजय महाजन, गुलाब चव्हाण,मंगलसिंग पवार इत्यादी कुस्तीगीर संघाचे पदाधिकारी उपस्थित होते तर जिल्ह्यातील अनेक क्रिडाप्रेमींची उपस्थिती यावेळी लाभली.
विजेत्या स्पर्धकांचे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी आमदार राजीवदादा देशमुख,शामसुंदर शुक्ल,कळंत्री विद्यालयाचे चेअरमन डॉ.सुनिल राजपूत,शिवाजी राजपूत,गोपाळ अग्रवाल,रवींद्र महाजन (एरंडोल) मालोजीराव भोसले (पाचोरा) यांनी अभिनंदन केले आहे.