Home क्राईम मुलाच्या विवाहाची पत्रीका वाटप करण्यासाठी जाणार्‍याचा अपघाती मृत्यू

मुलाच्या विवाहाची पत्रीका वाटप करण्यासाठी जाणार्‍याचा अपघाती मृत्यू

0
104


जळगाव पतिनिधी । मुलाच्या विवाहाची पत्रीका वाटप करण्यासाठी जाणार्‍या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आज शहराजवळ घडली.

याबाबत माहिती अशी की, खडके बुद्रुक ता. एरंडोल येथील श्रीराम उत्तम पाटील हे त्याच्या मुलाच्या लग्न पत्रिका वाटप जाळण्यासाठी खेडी येथे जात होते. कालिंका माता चौफुलीच्या पुढे असणार्‍या हॉटेल गौरव जवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. १० फेब्रुवारी रोजी त्याच्या मुलाचे लग्न होते त्यासाठी ते पत्रिका वाटप करण्यासाठी जात होते. त्यांना दोन मुले असून यातील इंजिनिअर मुलगा हा पुण्याला असून याचा विवाह उखलवाडी तालुका धरणगाव येथे होणार आहे. मात्र मुलाचा विवाह पाहण्याआधीच त्यांच्यावर काळाने झडप घातली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound