प्रेयसीने केली प्रियकराची हत्या; तलावात आढळून आला मृतदेह

यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवमातमाळ जिल्हयात एका सुतगिरणी कामगारांची हत्या त्या प्रेयसीनेच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी लोहारा येथील एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या मजुराचा मृतदेह यवतमाळ शहरातील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागील तलाव परिसरात आढळला होता. याबाबत पोलीसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. आपल्या मुलाची हत्या त्यांच्या प्रेयसीनेच केली आहे अशी तक्रार मजूराच्या वडिलांनी केली होती. त्यानंतर लोहारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील घरडे असे हत्या झालेल्या मजूराचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत तरुण लोहारा एमआयडीसीतील प्रियदर्शनी सुतगिरणीमध्ये काम करायचा. निखील नेहमीप्रमाणे 13 मे रोजी सकाळीच्या सुमारास सुतगिरणीत कामाला गेला. परंतु रात्री उशीरापर्यंतही तो घरी परतला नाही. त्यामुळे 14 मे रोजी सकाळी 10 वाजता मृतकाचे वडिल सुतगिरणीत गेले. त्या ठिकाणी चौकीदार व सुपरवायझर यांनी निखीलच्या प्रेमसंबंधाची माहिती दिली. 13 मे रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास निखील सुतगिरणीच्या बाहेर गेला होता. फोन करूनही व शोध घेऊनही न मिळाल्यामुळे त्याच्या वडिलांनी लोहारा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. दरम्यान बुधवारी मृतकाचे वडिल व मोठा भाऊ किर्तीकुमार हे निखीलच्या शोधात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मागच्या परिसरात पाहणी करीत होते. यावेळी तलावाच्या 30 फूट अलीकडे उंचावर एक मृतदेह दिसला. जवळ जावून बघितल्यानंतर मृतदेह हा निखीलचाच होता. मृतकाच्या शरीरावर शर्ट नव्हता तर नाकातून व कानातून रक्त येत असल्याचे दिसले. तसेच गळा आवळल्याच्या खुणाही आढळल्या. मृतकाचे त्या महिलेशी प्रेमसंबंध होते. दोघेही सुतगिरणीतून एकाचवेळी बाहेर पडले. त्यामुळे त्या महिलेनेच मुलाचा घातपात केल्याचा संशय आहे, अशी तक्रार लोहारा पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Protected Content