अहमदनगर प्रतिनिधी | राज्याचे माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांनी आज राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती मध्यंतरी खालावली होती. यामुळे त्यांना पुणे येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अनुषंगाने आज माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांनी राळेगणसिध्दी येथे जाऊन अण्णा हजारे यांची भेट घेतली.
याप्रसंगी अण्णा हजारे यांच्याशी वार्तालाप करतांना राजकीय, सामाजिक आणि शेतकर्यांच्या विषयांवर चर्चा झाली. यात विशेष करून खान्देशात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती अण्णा हजारे यांनी जाणून घेतली. आ. महाजन यांनी अण्णा यांना आराम करण्याचे सांगून निरोप घेतला.