गिरडगाव येथे बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

yawal bus agar nes

यावल, प्रतिनिधी । यावल बस आगराच्या मनमानी कारभारामुळे बसेसला थांबा असतांना बस थांबत नसल्याने तालुक्यातील गिरडगाव येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत गिरडगाव येथील ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांनी होणाऱ्या गैरसोयीबद्दल आगर प्रमुखांना लेखी निवेदन दिले.

याबाबत माहिती अशी की, येथील एस.टी.आगाराच्या गोंधळलेल्या मनमानी कारभारामुळे तालुक्यातील बऱ्याच ठीकाणी एस.टी. बसेस सोडल्या जात नाही किंवा बसेस बंद करण्यात येतात. एस.टी.आगाराच्या या दुर्लक्षीत व अनियोजीत कारभाराबद्दल यावल बसस्थानकावर नेहमीच विद्यार्थी, विद्यार्थीनी यांच्यात विविध कारणांनी खटके उडतात. हा विषय बऱ्याच वेळी होत असतांना प्रभारी आगारप्रमुख हे प्रवाशी किंवा विद्यार्थी यांचा विषय असो यावर तोडगा काढण्यात नेहमीच असमर्थ दिसुन येतात अशी प्रवाशांची ओरड आहे.

यावल तालुक्यातील गिरडगाव येथील बसस्थानकावर बसेसचा अधिकृत थांबा असलेल्या एस.टी. देखील थांबत नसल्याने यावल, साकळी, किनगाव येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी हे अनेक वेळ एस.टी. बसेसची वाट बघत असतात तरी देखील एसटी बस आल्यावर स्थानकावर बसथांबा असतांना देखील बस थांबत नसल्याने विद्यार्थी पालकांमध्ये यावल एस.टी.आगाराच्या या मनमानी कारभारामुळे नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नेहमी होणाऱ्या त्रासला कंटाळुन अखेर गिरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना होत असलेल्या गैरसोयी बद्दल पावल आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही भालेराव यांना लेखी तक्रार देवुन विधार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणीक नुकसाना संदर्भात लेखी निवेदन दिले आहे.

यावल एसटी आगारातील चालक आणी वाहक यांच्या मनमानी कारभारा मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची जाणीव लेखी तक्रारी व्दारे गिरडगाव येथील सरपंच यांचे पती मधुकर पाटील, यांच्या सोबत प्रशांत पाटील, दिलीप पाटील, रावण पाटील, प्रमोद पाटील, भुषण पाटील यांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन प्रभारी आगार प्रमुख एस.व्ही. भालेराव यांना देण्यात आले असुन गावाला बस थांबा असल्यावर देखील जर बसथांबत नसेल तर अशा चालक व वाहकांच्या सेवेत योग्य ती सुधारणा करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होवु नये या करीता याची काळजी घ्यावी अशा सुचना ही देण्यात आल्या आहेत.

Protected Content