पद्मालय येथे अंगारकी यात्रेला पितृपक्षामुळे फटका

erandol news

एरंडोल प्रतिनिधी । मंगळवार रोजी अंगारकी चतुर्थी निमित्त हजारो भाविकांनी श्रीचे दर्शन घेतले. ब्रह्म मुहूर्तावर ३:३० वाजता मंदिराचे पुजारी केशव पुराणिक यांच्या मंत्रोप्चाराने आणि जळगावचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याहस्ते महापुजा करण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी, मंडळ अधिकारी जाधव महसुल कर्मचारी तथा देवस्थानचे सर्व विश्वस्त हजर होते. यावेळी मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती. तसेच श्री क्षेत्र पद्मालय येथे अंगारकी चतुर्थीच्या योग असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनबारी, स्वयंसेवक, रुग्णवाहिका, पोलीस बंदोबस्त, जनरेटर व महामंडळातर्फे एस.टी. बसेसची व्यवस्था व डॉ.पी.जी.पिंगळे यांच्या तर्फे सालाबादाप्रमाणे या वेळेसही मोफत वैद्यकीय सेवा भाविकांसाठी पुरविण्यात आली.

यावेळी पितृपक्षात अंगारकी चतुर्थीचा योग आल्याने भाविकांच्या उपस्थितीत घट दिसुन आली. या अंगारिकेला ३० ते ३५ हजार भाविकांनी हजेरी लावली. याप्रसंगी जिल्ह्या भारासह महाराष्ट्रातुन भाविक दर्शनासाठी आले होते. तसेच श्री क्षेत्र पद्मालय च्या तलावात फुललेली कमळाची फुले जणूकाही भाविकांचे स्वागत करीत होते.

Protected Content