अहिरे बुद्रुक येथील पाण्याची टाकीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे

viju

धरणगाव । राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धरणगाव-सोनवद रस्त्यावर असलेल्या अहिरे बुद्रुक या गावासाठी पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभासाठी 46 लाखांची योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेचे काम पुर्ण करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची ओरड रहिवाश्यांकडून होत आहे.

पाणीपुरवठा योजनेंतर्गत निधी मंजूर झाल्यानंतर मे 2018 मध्ये प्रत्यक्ष कामास सुरूवात करण्यात आली. दहा महिन्यापासून सुरू असलेले काम योग्यरित्या होत नसल्याची तक्रार नागरिकांनी संबंधित ठेकेदार यांच्याकडे केली होती. मात्र यावर उत्तर देत, हे काम अपुर्ण असल्याचे सांगत होता. दरम्यान आजच्या परिस्थितीत हे काम पुर्णत्वास आले आहे. ठेकेदारने केलेल्या कामची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक रहिवाशी करीत आहे.

 

पाण्याच्या टाके अद्यप उद्घाटनही झालेले नाही, तरी आत्तापासून पाण्याच्या टाकीला तळे गेलेत तर टाकीवरील भागावर लावलेले सुरक्षा कठोडे पुर्णपणे हालतात. तर पाण्याच्या टाकीवर लावलेल्या सिडी पुर्णपणे कमजोर असल्याचे दिसून आले आहे. जिथून पाणी पाणीपुरवठा केला जातो ती विहीर गावापासून ४ कि मी अंतरावर आहे. त्या विहिरीचे खोदकाम हे ५० फूट करण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र प्रत्यक्षात ते फक्त 40 फुट खोल खोदाई केलेली असल्याचही तक्रार नागरीकांनी केली आहे.

Add Comment

Protected Content