नागपूर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | विद्यापीठात होणाऱ्या दीक्षांत कार्यक्रमाच्या इंग्रज पद्धती ऐवजी सोपी पद्धती अंमलबजावणी आगामी वर्षापासून करण्यात येईल, तसेच अभ्यास किंवा करिअर मार्गदर्शनासाठी विद्यार्थ्यानी ऑनलाईनच्या मानसिकतेतून बाहेर पडावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले
विद्यापीठातर्फे आयोजित दीक्षांत कार्यक्रम इंग्रजी पद्धतीचा रटाळ लांबलचक आहे. अनेकांना झोपा येतात. त्यात बदल करून दीक्षांत मिरवणूक विद्यार्थ्यांची हवी. विद्यार्थी महत्वाचा असून त्यांना काय हवे याचा विचार आवश्यक आहे. त्यामुळे युवकांच्या कलाने कार्यक्रम घेण्यात यावेत, जेणेकरून त्यात विद्यार्थांचा उत्साह दिसायला हवा. इंग्रजांच्या दीक्षांत पध्दती बंद करून यापुढे दीक्षांत सोहळे मराठमोळ्या पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नागपूर येथे झालेल्या शासकीय तंत्रनिकेतनच्या पदवीदान सोहळ्यात ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, दीक्षांत समारंभामध्ये विद्यार्थ्यांनी काय करावे याचे मार्गदर्शन करणारे राजकारण आणि पक्षविरहीत नागरिक, मंडळी व्यासपीठावर उपस्थिती हवी. राजकीय पदाधिकारी आम्ही काय मार्गदर्शन करणार, असे समारंभ विद्यार्थ्यांसाठी मागर्दर्शक ठरतील असेच झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांना प्रगल्भता यावी, ज्ञानाचे भांडार किंवा अद्ययावत माहितीसाठी वाचन मनन महत्वाचे असून यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइनच्या मानसिकतेतून बाहेर काढावे लागेल लागेल असेही ना. सामंत यांनी म्हटले आहे.
कुलगुरू किंवा त्यांच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, वेतनाची किंवा कुलसचिवांची थकबाकी असेल तर त्यावेळी मंत्र्याची मदत लागते. मात्र विद्यार्थी हिताच्या गोष्टी किंवा चांगल्या कामासाठी आम्ही सूचना दिल्या तर लगेच राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप होतो. या राजकीय हस्तक्षेप संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोरच ना. उदय सामंत यांनी तीव्र नाराजी केली.