शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रक्तदान

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली, जळगाव तालुका शाखा आणि संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रुग्णालयातील रक्तपेढीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले.

यावेळी रक्तदान केलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली, जळगाव तालुका शाखा आणि संघर्ष दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयातील सुसज्ज रक्तपेढीमध्ये स्व:इच्छेने रक्तदान केले. यावेळी एकूण ७ रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.

यावेळी रक्तदान केलेल्या पदाधिकाऱ्यांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. श्रीनिवास पाटील यांचीसुद्धा उपस्थिती होती. याकरिता अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक पाटील, अधिपरिचारक तेजस नेमाडे, तंत्रज्ञ दीपक कुमार होनमाने, सौरभ राऊत, प्रभाकर पाटील आदींनी सहकार्य केले.

किशोर नेवे यांनी केले ६१ वे रक्तदान

यावेळी मानवाधिकार संघटनेचे जळगाव तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी १२ वे, सदस्य जितेंद्र पाटील यांनी ३३ वे तर सदस्य किशोर नेवे यांनी ६१ वे रक्तदान केले. त्याचप्रमाणे संघर्ष दिव्यांग कल्याण बहु. संस्थेचे अध्यक्ष गणेश पाटील यांनी ५० वे, सदस्य प्रवीण भोई यांनी १० वे, सदस्य दत्तात्रय महाजन यांनी पहिल्यांदा तर शहरी बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांनीसुद्धा यावेळी रक्तदान केले.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही केले रक्तदान

शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालयात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे महाविद्यालयातील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांतील अंकिता ढमढेरे, जेनीटा जैसन आणि शेवटच्या वर्षातील ऋषिकेश स्वामी या विद्यार्थ्यांनीसुद्धा स्व:इच्छेने रक्तदान केले. या विद्यार्थ्यांचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक करून जी व्यक्ती रक्तदान करू शकतो त्याने निर्भीडपणे पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

 

 

 

Protected Content