भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कल्याण मानद पशु कल्याण अधिकारी म्हणुन शहरातील गौसेवक तथा प्राणीमित्र रोहित महालेंची ७ फेब्रुवारी रोजी नियुक्ती करण्यात आलेली आहे. गेली अठरा वर्षांपासून संघर्ष करत निस्वार्थी गौसेवा बरोबर संकटात सापडलेल्या अन्य जखमी जीवांना वाचविल्यामुळे त्यांना ही संधी मिळालेली आहे. याबद्दल महाले यांनी शासनाचे ह्रदयापासुन धन्यवाद मानले.
मिळालेल्या संधीचे सोने करत दुप्पटीने मुक्या जीवांच्या सेवेचे कार्य करणार बुधवारी मुंबईला जात मंत्रालयातुन कार्ड घेत सर्व श्रेय आई गोमातेला गुरुवर्य मिलीदजी एकबोटे साहेबांना आहे, असे महालेंनी सांगितले. त्यांना देशभरातुन विविध संघटना व गोप्रेमी कडून शुभेच्छा मिळाल्या