भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या श्वान पथक नेहमीप्रमाणे रेल्वे गाडीत तपासणी करत असतांना गांधीधाम एक्सप्रेसमधील जलरल डब्यात एका बेवारस बॅग आढळून आली. यात अंदाजे ४० हजार रूपये किंतमीचा गांजा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे सुरक्षा बल पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र इंगळे व दीपक पाटील हे आपल्या श्वान पथकासोबत नेहमीप्रमाणे प्रत्येक रेल्वे बोगीत तपासणी सुरू असतांना गांधीधाम एक्सप्रेसमधील जनरल डब्यात एक बेवारस बॅग आढळून आली. या बॅगेची तपासणी केली असता या बॅगेत अंदाजे ४० हजार रूपये किंमतीचा गांजा आढळून आला. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ही बॅग ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.