अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात किरकोळ कारणावरून पुतण्यासह काकाला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत करत दुकानातील गल्ल्यातून 10 हजारांची रोकड काढून जीवेठार मारण्याची तरतुदी दिल्याची घटना 28 ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात 8 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, कामील हुसेन खाटीक (वय -, रा. अमळनेर) हा तरुण आपला परिवारासह आहे. चिकन दुकान लावून तो आपला उदरनिर्वाह करतो त्याचे अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे महाराष्ट्रात चिकन सेंटर नावाचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे 28 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता कामिल हा दुकानावर असताना काहीही कारण नसताना सोनू बिऱ्हाडे यांच्यासह इतरांनी त्याला शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली. तसेच कामील हुसेन खाटीक याचे काका सलीम खाटीक यांना देखील सर्वांनी बेदम मारहाण करून त्यांच्या दुकानातील गल्ल्यातून 10 हजार रुपयांची रोकड काढून घेत दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या घटनेबाबत कामिल हुसेन खाटीक याने अमळनेर पोलिसात शनिवारी 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे सोनू संजीव बिऱ्हाडे, विकी मंगल सपकाळे, राहुल बिऱ्हाडे, अक्षद बैसाने, रोहित अहिरे, दर्शन बिऱ्हाडे सागर वाघ आणि रुद्र संदांनशिव सर्व रा. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत.