बांधकाम साईटवरुन साहित्याची चोरी करणारा गजाआड; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । जळगाव औरंगाबाद रस्त्यावरील एका हॉटेलच्या बांधकामाच्या साईडवरून बांधकामाचे साहित्याची चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

लखन दशरथ बाविस्कर, रा. राम नगर, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी जळगाव परिसरातील जळगाव-औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल मैत्रीय चौफुलीवर एका हॉटेलचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या देखरेखीसाठी योगेश झिपरू शिंदे (वय-५७) रा. रामानंदनगर जळगाव हे देखरेखीसाठी आहे. त्यांच्यासोबत असलेल्या मिस्तरी जावेद शेख मोयुद्दिन रा. दंगल ग्रस्त कॉलनी जळगाव यांनी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता काम आटोपून बांधकामाचे सर्व साहित्य दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्टोअर रूममध्ये ठेवून कुलूप लावले होते. दरम्यान मंगळवारी १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मिस्तरी जावेद शेख मोयुद्दिेन बांधकामाच्या ठिकाणी गेले असता त्यांना बांधकामाचे साहित्याची स्टोअर रूमचा दरवाजता अर्धवट उघडा दिसला. आत जाऊन पाहिले  धकामाचे विविध साहित्य असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, हेमंत कळसकर, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, सतिष गर्जे, निलोफर सैय्यद या पथकाने संशयित आरोपी लखन दशरथ बाविस्कर, रा. राम नगर, जळगाव याला शुक्रवारी २१ जानेवारी रोजी सकाळी रामनगरातून अटक केली आहे. त्याच्याकडून ४० हजार रूपये किंमतीचे साहित्या जप्त करण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयित आरोपी लखन बाविस्कर यांच्यावर वेगवेगळे चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Protected Content