खान्देश शिक्षण मंडळावर तात्काळ प्रशासक बसवा, अन्यथा आंदोलन; प्रहारची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । खान्देश शिक्षण मंडळावर त्वरित व तात्काळ प्रशासक नेमण्यात यावे, अन्याथ शिक्षण मंत्री बच्चु कडु यांच्या समोर प्रशासनाचा भोंगळ व मनमानी कारभार प्रत्यक्ष लक्षात आणुन देण्यात येईल, त्याच्या मार्गदर्शनानुसार प्रहार स्टाईल आदोंलनाची भुमिका घेण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद व दखल घ्यावी, अशा मागणीचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, कोविड-19 संदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन सुचना व आदेश शासन स्तरावरून व मंत्रालयातून दिले जात आहेत. शासनाच्या सुचनांचे व आदेशांचे तंतोतंत पालन करणे हे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य व जबाबदारी आहे.

तथापि असे असताना महाराष्ट्रात नुकत्याच नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या व हजारो लोकांच्या उपस्थितीत विजय मिरवणुका काढण्यात आल्यात अमळनेरमध्ये देखील खा. शि. निवडणूकीबाबत सर्व कामकाज प्रचार सुरू असताना ऐनवेळी खा. शी निवडणूक पुढे ठकलणयाची प्रयोजन जनतेच्या लक्षात येण्यासारखे नाही. विद्यमान खा शि संचालक पदभार असाच सुरू ठेवावा यासाठी राजकीय डावपेच तर नाही? असा सवाल जनतेतुन पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका निष्पक्षपाती आहे, असे सिद्ध करण्यासाठी खा.शी. शिक्षण मंडळावर त्वरित व तात्काळ प्रशासक नेमण्यात यावे, अन्याथ आमचे लोकप्रिय लोकनायक शिक्षण मंत्री बच्चु कडु याच्या समोर प्रशासनाचा भोंगळ व मनमानी कारभार प्रत्यक्ष लक्षात आणुन देण्यात येईल, त्याच्या मार्गदर्शनानुसार प्रहार स्टाईल आदोंलनाची भुमिका घेण्यात येईल याची गांभीर्याने नोंद व दखल घ्यावी, निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित गुलाब पाटील तालुका अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर, रविंद्र पाटील प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका अध्यक्ष अमळनेर, प्रविण पाटील शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमळनेर, दिनेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजेंद्र पाटील उपस्थित होते.

 

Protected Content