अमळनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी अर्थात ग.स. सोसायटीतर्फे जिजाऊ कन्यादान योजनेच्या अंतर्गत वधूला भेट देण्यात आली.
ग.स. सोसायटीने या वर्षापासुन संस्थेने राजमाता जिजाऊ कन्यादान योजना सुरु केली आहे. याच्या अंतर्गत दिलीप दामु पाटील यांची सुकन्या सौ.का, वर्षा राणी हिला शनिवारी हळदीच्या कार्यक्रमात रुपये ५००० हजारांचा धनादेश आबासाहेब शामकांत भदाणे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.