विरावली ग्रामपंचायत इमारतीच्या बांधकामास निधी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथे नवीन ग्रामपंचायतीच्या इमारतीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नांनी २० लाख रूपयांचा निधील मंजूर करण्यात आला आहे. 

राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानातून निधी प्राप्त करण्यासाठी पालक मंत्री गुलाबराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा विरावली ग्रामपंचायत माजी सरपंच, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की महाराष्ट्र शासन राज्य प्रकल्प व्यवस्थापन कक्ष राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य अभियान अंतर्गत ग्राम विकास विभागाकडील पत्र तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज्य या कार्यालयाकडील निधी विचारणा आदेश पत्र  ऑक्टोंबर २०२० राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत विरावली येथे ग्रामपंचायतीची इमारत फार जुनी झाली असून विरावली येथे ग्रामपंचायतीचे नविन इमारतीचे बांधकाम मंजूर केलेले आहे. सरपंच कलिमा तडवी, उपसरंपच मनिषा पाटील यांनी देखील पाठपुरावा सुरु ठेवला होता.

याशिवाय जिल्ह्यात चिंचखेडा खुर्द (ता. मुक्ताईनगर), खिरवड (ता. रावेर), निमखेडा (ता. धरणगाव ), जाणवे (ता. अमळनेर), देवगांव (ता. पारोळा), अंतुर्ली खुर्द प्र. लो. (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीच्या नविन इमारत बांधकामासाठी प्रत्येकी पाच लाख निधी मंजूर झाला आहे. तर नागरी सुविधा केंद्र खोल्यांसाठी नाडगाव ( ता.बोदवड ), अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर), वर्डी, घोडगाव (ता. चोपडा), रोझोदा (ता. रावेर), आमोदा (ता. यावल) व पाळधी बुद्रुक (ता. धरणगाव), शिरसोली प्र.बो. (ता. जळगाव), जवखेडा, पातोंडा(ता. अमळनेर), देवगाव, उत्राण (ता. पारोळा),जारगाव, नगरदेवळा (ता. पाचोरा ),येथील ग्रामपंचायतींना नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामासाठी प्रत्येकी दोन लाख मंजूर झाले आहेत. दरम्यान आपण पालकमंत्री तथा आमदार यांच्या माध्यमातुन केलेल्या प्रत्यनांना अखेर यश मिळाले असुन . शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सर्वाचे आभार मानले आहे .

Protected Content