अरेरे….सिलींडरसह महापालिकेत आंदोलन करणार्‍या रूग्णाचा मृत्यू !

नाशिक । रूग्णालयात बेड मिळत नसल्याचा निषेध म्हणून ऑक्सीजन सिलेंडरसह नाशिक महापालिकेत आंदोलन करणार्‍या रूग्णाचा मध्यरात्री उपचार सुरू असतांना मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, सगळीकडेच कोरोनाची रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने रूग्णांना हॉस्पीटलमध्ये जागाच नसल्याचे दिसून येत आहे. बेड व्यवस्थापनाची प्रणाली सर्वच ठिकाणी कोलमडून पडली आहे. या अनुषंगाने काल नाशिक महापालिकेत एक नाट्यमय घटना घडली.

नाशिक येथील एका रूग्णाचा कोरोना रिपार्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याला कोणत्याही रूग्णालयात जागा मिळत नव्हती. यामुळे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांनी या रूग्णाला थेट नाशिक महापालिकेत आणले. यानंतर संबंधीत रूग्णाने तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली. काही वेळातच प्रशासनाने याची दखल घेत त्या रूग्णालया बिटको हॉस्पीटलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असतांना मध्यरात्रीच्या सुमारास संबंधीत रूग्णाचा मृत्यू झाला.

या प्रकरणी आता संबंधीत रूग्णालया महापालिकेत आणणारे सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांच्यावर महापालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content